Home अहिल्यानगर धक्कादायक: पोलीस अंमलदाराचा तरूणीवर अत्याचार

धक्कादायक: पोलीस अंमलदाराचा तरूणीवर अत्याचार

Police officer tortures young woman

अहमदनगर | Ahmednagar:  येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराने तरूणीवर अत्याचार  केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्यासह नातेवाईकांविरूध्द अत्याचार, फसवणूक  आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण  ईस्ट, ठाणे येथे राहणार्‍या तरूणीने फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस अंमलदार किरण कोळपे, आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सिताराम, त्यांचा एक नातेवाईक उत्तम, आशाबाईच्या मामाचा मुलगा भारत (पूर्ण नाव माहिती नाही, रा. विळद ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. जुन 2006 ते जानेवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असल्याचे पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आशाबाई कोळपे, तिचा भाऊ सिताराम, नातेवाईक उत्तम व भारत यांनी संगमताने मला 2006 मध्ये गाडीतून प्रवास करीत असताना पिण्याच्या पाण्यातून औषध देवुन सांताक्रुझ येथे नेले. तेथे अश्लिल फोटो काढले. तसेच किरण कोळपे याने जबरदस्तीने शारिरीक संबंध (Sexual ralation) करून अश्लिल फोटो (Pornographic photos) काढले आहेत. किरण कोळपे याने वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संंबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Police officer tortures young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here