धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच टाकला दरोडा
Breaking News | Pune Crime: पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा (robbed) टाकला.
पुणे: पुणे तेथे काय उणे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच अफरातफर केली आहे. रक्षकच असे करायला लागले तर कसं व्हायचं? अशी चर्चा परिसरात सुरु आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा टाकला. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी विकल्या. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे असे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या आरोपीकडून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांनी काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले अशी कबुली या आरोपीने दिली तसचं या गाड्या स्क्रॅप च्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचारीने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावले होते मात्र त्यांनी उपस्थिती लावली नाही परिणामी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली.
Web Title: police personnel robbed the police station itself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study