Home संगमनेर संगमनेरात ११०० किलो गोमांस जप्त

संगमनेरात ११०० किलो गोमांस जप्त

Breaking News | Sangamner Crime: असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा (Raid) टाकून २ लाख २० हजाराचे ११०० किलो गोमांस जप्त.

Police Raid 1100 kg of beef seized in Sangamner

संगमनेर : शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख २० हजाराचे ११०० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी एका विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली नंबर ७ मध्ये बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. शहर पोलिसांनी रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी या कत्तलखान्यातून ११०० किलो गोमांस जप्त केले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमित कुहे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी रैय्यान शेरखान पठाण (वय २१, रहेमतनगर, संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पठाण याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक दामू महाले करीत आहेत.

Web Title: Police Raid 1100 kg of beef seized in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here