Home क्राईम संगमनेर: कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ८३ जनावरांची सुटका, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर: कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ८३ जनावरांची सुटका, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangamner News: पोलिसांचा छापा (Raid), कत्तलीच्या उद्देशाने शेडमध्ये बांधून ठेवलेल्या ८० वासरे, ३ गायी अशा एकूण ८३ जनावरांची संगमनेर तालुका पोलिसांनी मुक्तता.

Police Raid Freeing of 83 animals bound for slaughter, seizure of goods worth 8 lakhs

संगमनेर: कत्तलीच्या उद्देशाने शेडमध्ये बांधून ठेवलेल्या ८० वासरे, ३ गायी अशा एकूण ८३ जनावरांची संगमनेर तालुका पोलिसांनी वडगाव पान येथे छापा टाकून मुक्तता केली आहे. रात्री या ठिकाणावरून ८ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगावपान शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये फारुक सय्यद याने भाडेतत्त्वावर शेड टाकले होते. तो या शेडमध्ये कत्तलीसाठी आणलेली जनावरे ठेवत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास दुमने यांना समजली.

याबाबत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासणी केली असता शेडमध्ये ८० वासरे आणि ३ गायी शेडमध्ये बांधून ठेवले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शेडच्या बाहेर दोन पीकअप आणि एक छोटा हाथी ही दोन वाहने आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. वासरांची व गायींची पांजरपोळमध्ये रवानगी करण्यात आली.

याबाबत कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पल्लवी वाघ करीत आहेत.

Web Title: Police Raid Freeing of 83 animals bound for slaughter, seizure of goods worth 8 lakhs

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here