Home अहमदनगर अहमदनगर: कॅफेवर पोलिसांचा छापा, पडद्याआड धक्कादायक

अहमदनगर: कॅफेवर पोलिसांचा छापा, पडद्याआड धक्कादायक

Breaking News | Ahmednagar Raid: पडद्याआड बसलेल्या मुला-मुलींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले.

Police raid on Ahmednagar cafe, shocking behind the scenes

अहमदनगर : दिल्ली गेट येथी एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला असता पडद्याआड बसलेल्या मुला-मुलींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. काही जण पोलिसांची चाहूल लागताच छुप्या मार्गाने पसार झाले. याप्रकरणी एकावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश पांडुरंग जाधव (वय २६, रा. जाधवमळा, बालिकाश्रम रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. दिल्ली गेट येथील युनिक कॅफेत काही मुले-मुली बसलेले आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी युनिक कॅफेवर बुधवारी सायंकाळी छापा टाकला असता तिथे काही मुले व मुली मिळून आल्या. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. आरोपीस परवान्याबाबत विचारणा केली असता कॅफे चालविण्याचा कुठलाही परवाना नव्हता. कोणताही परवाना न घेता

कॅफेत छोटे-छोटे कंपार्टमेंट तयार करून पडदे लावून मुला-मुलींना बसण्यासाठी जागा तयार करण्यात आली होती. पोलिसांनी कॅफेची तपासणी केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद कोकर यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, बाळासाहेब भापसे, सतीश भवर आदींच्या पथकाने केली.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

पोलिसांनी कॉफी बनविण्यासाठी गॅस, साखर व पावडर आहे का? याबाबत विचारणा केली, तेव्हा तेथील कर्मचारी गोंधळून गेले. बाहेर कॅफेचा बोर्ड लावलेला होता. परंतु, या कॅफेमध्ये कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्यच उपलब्ध नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Police raid on Ahmednagar cafe, shocking behind the scenes

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here