Home Crime News संगमनेर शहरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

संगमनेर शहरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

संगमनेर | Sangamner:  बेकायदेशीर जनावरांची कत्तल करणार्‍या कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा (raid) टाकत 250 किलो 37 हजाराचे गोवंश जनावरांचे मांस जप्त करण्यात आले असून 25 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली क्रमांक 9 मध्ये अब्दुल हमीद अहमद कुरैशी याच्या वाड्यात 250 किलो गोवंश जनावरांचे मांस पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मिळून आले. सदर गोमांस जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस शिपाई गणेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल हमीद अहमद कुरैशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच शहरातील रहेमतनगर जवळील काटवानात गोवंश जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने आणले असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 17 गायी एक लाख रुपये किंमतीच्या, 2 बैल 30 हजार रुपये किमतीचे, 4 वासरे 20 हजार रुपये किमतीचे 2 रेडे 20 हजार रुपये किमतीचे असे एकूण 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे जनावरांची पोलिसांनी छापा टाकून सुटका केली आहे. सदर जनावरांची रवानगी पांजरपोळ येथे करण्यात आली आहे. यामधील आरोपी फरार झाला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विवेक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धिंदळे करत आहेत.

Web Title: Police raid slaughterhouse in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here