Home Crime News लोकांनी सोडली होती आशा पण पोलिसांनी परत मिळवून दिले 4.50 लाखांचे हरवलेले...

लोकांनी सोडली होती आशा पण पोलिसांनी परत मिळवून दिले 4.50 लाखांचे हरवलेले मोबाईल

Kalyan Police

कल्याण : सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने कोळसेवाडी, महात्मा फुले चौक, बाजारपेठ व खडकपाडा पोलीस हद्दीत गहाळ झालेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतींचे मोबाईल परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तसेच कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९ ते २०२१ या कालावधीत वेगवेगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक माहितीच्या आधारे (Cyber Cell) शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेत हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त करून दाखवली.

Web Title : Police recover 32 lost mobile phones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here