धक्कादायक! हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीत पोलीस उपनिरीक्षक
Breaking News | Pune Crime: हनीट्रॅप टोळीत पोलीस उप निरीक्षकाचा समावेश असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ.
पुणे : हनीट्रॅप मध्ये अडकवून एका ज्येष्ठाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सामील असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक पसार झाला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मारुती उभे (वय ५५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहजालात अडकवून ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अवंतिका सचिन सोनवणे (वय ३५), पूनम संजय पाटील (वय ४०), आरती संजय गायकवाड (वय ५८, तिघी रा. कोथरुड) यांना अटक करण्यात आली. पूनम पाटीलविरुद्ध काेल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका डाॅक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांनी सुरु केला. लक्ष्मी रस्त्यावरील हाॅटेलमध्ये महिलेने आधारकार्ड दिले होते. पोलिसांनी तपास करून अवंतिका सोनवणेसह, पूनम पाटील, आरती गायकवाड यांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही चित्रीकरणात एक मोटार आढळून आली. तेव्हा मोटार मुळशीतील एकाच्या नावावर असल्याचे समजले. चौकशीत मोटारीचा वापर पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ उभे करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी उभे याला ताब्यात घेतले. उभे या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे. हाॅटेलमधील खोलीत महिला हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून प्रवेश करणाऱ्या महिलांसोबत उभे असल्याची माहिती तपासात मिळाली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: police sub-inspector in a gang of robbers caught in a honeytrap
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study