बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Beed Suicide Case: पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर.
बीड: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराड आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या एसआयटीत समावेश होता. आरोप झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयटीतून काढण्यात आले होते. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: policeman committed suicide by hanging himself in Beed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News