Home Ahmednagar Live News सरळ माणसाचे राजकारण राहिले नाही, शिवसैनिक हळहळले

सरळ माणसाचे राजकारण राहिले नाही, शिवसैनिक हळहळले

politics of a straight man is no more, Shiv Sainiks are agitated

Ahmednagar | अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले आहेत. ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर बहुतांश सेना नेत्यांचे फोनच बंद झाले.

सामान्य शिवसैनिकांमध्ये सत्ता गेल्याचे दुःख झाले. सत्ता गेल्याची सल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही होती. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे भाजपची सत्ता येणार असल्याने भाजपने जल्लोष केला. नगर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके  वाजवले व पेढे वाटप करून जल्लोष केला. सामान्य लोकांमध्येही सरकारकोसळल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. सरकार कोणाचेही असो, विकास कामे व्हावीत, अशी अपेक्षाही | सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

सर्व शिवसैनिकांसाठी सध्याची परिस्थिती मोठी दुःखदायक आहे. उद्घव  ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री पदासह विधानपरिषद सदस्यत्याचाही  राजीनामा देत जनतेचे मन जिंकले आहे. येणाऱ्या काळात त्यांचे नेतृत्व आणख मोठे होणार असून, महाराष्ट्रात भगवे वादळ निर्माण होईल. नगर शहरातील सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत होते आणि येणाऱ्या काळातही खंबीरपणे सोबत राहतील. – संभाजी कदम, शिवसेना शहरप्रमुख

उद्धव ठाकरे यांच्यामागे शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक ठामपणे उभा आहे. पुन्हा मोठ्या ताकदीने भरारी घेऊ. २० टक्के राजकारण वजा झाले असले तरी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे ८० टक्के समाजकारण सुरूच राहील. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची कोरोनातील कामगिरी, तसेच गेल्या अडीच वर्षातील कामकाज समाधानकारकच होते. -संदेश कार्ले, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिन असला, तरी ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत. पक्षप्रमुख आहेत. नगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही. पक्षात स्थानिक ठिकाणी काही नाराज असले, तरी त्यांची नाराजीही येत्या काळात दूर होईल. – विक्रम राठोड, युवा सेना जिल्हाप्रमुख

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी राज्य उत्तमरित्या चालविले. शेतकरी हिताचे निर्णय घेतले. पक्षात बंडखोरी. झाल्यानंतर पदाचा कुठलाही मोह न ठेवता त्यानी राजीनामा दिला. याचे दुःख सर्व शिवसैनिकाना आहे. आम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहोत. येणाऱ्या काळात जिल्ह्यात नगर जिल्ह्यात सेनेची ताकद आणखी वाढविण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.- अविनाश कोतकर, युवा सेना उपजिल्हा

जे काही झाले ते वाईट झालं. उध्दव ठाकरे हे सरळ मनाचे आहेत. सरळ माणसाचे राजकारण राहिले नाही. शिवसेनेत यापूर्वी कधीही घडले नाही. असा प्रसंग निर्माण उभा राहिला. हे दुर्दैव  आहे.- अंबादास पंधाडे, ज्येष्ठ शिवसैनिक

मुख्यमंत्र्याचा राजीनामा ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्देवी घटना आहे. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पक्ष आणखी मजबूत होईल. त्यावेळेस विरोधकांना शिवसेनेची ताकद कळेल. – आबासाहेब नळे, समन्वयक शिवसेना वैद्यकीय कक्ष, राहाता.

Web Title: politics of a straight man is no more, Shiv Sainiks are agitated

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here