आळंदीत भोंदू महाराजांवर पोस्को; तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर नैसर्गिक अत्याचार
Breaking News | Pune Crime: तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार (abused) केल्याची धक्कादायक घटना आळंदीतून समोर आली आहे.
आळंदी: तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित महाराजाने केल्याची घटना आज आळंदीत उघड झाली. याप्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनला कलम भादंवी ३७७ व पोस्को कायदा कलम ४ ५ ( f ) ६ ८ १० अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय:५२,रा. घुंडरे गल्ली, आळंदी देवाची,ता.खेड,जि पुणे) असे भोंदू महाराज आरोपीचे नाव असुन आळंदी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. संबंधित आरोपीला दिघी येथिल लाॅकअप मधे ठेवले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , याप्रकरणी फिर्याद पिडित बालकांच्या नातेवाईकांनी दिली आहे. आरोपी दासोपंत उंडाळकर हा मुळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील असून गेली तीस वर्षापेक्षा अधिक काळ आळंदीत राहत आहे. पिडित तीनही विद्यार्थी मुळचे परभणी जिल्ह्यातीलच आहेत. आरोपी दासोपंत उंडाळकर याने पिडित विद्यार्थ्यांवर मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगीतले.
दरम्यान आज आळंदी पोलिसांत तक्रार देणेसाठी आले. आरोपी प्रतिष्ठित महाराज असल्याने विविध स्तरावरून राजकीय दबावही पिडितांच्या पालक आणि पोलिसांवर असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात होती.
दरम्यान गुन्ह्याची प्राथमीक माहिती कळाल्यावर पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयाचे पोलिस उपआयुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, यांनी भेट दिली. स्थानिक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल गोडसे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी उंडाळकरला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक अनिल लोहार करत आहेत.
Web Title: Posco on hypocritical maharajas, Natural assault on three minor Warkari students
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study