Home Maharashtra News Nitesh Rane यांना पुढील चौकशीसाठी पुण्यात नेण्याची शक्यता

Nitesh Rane यांना पुढील चौकशीसाठी पुण्यात नेण्याची शक्यता

Nitesh Rane

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. अटक होऊनही त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कणकवली पोलिसांकडून आणखी एक अनपेक्षित निर्णय घेतला जाउ शकतो. पुढील तपासासाठी पोलीस नितेश राणे यांना पुण्यात नेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याची प्लॅनिंग पुण्यात झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने नितेश राणे यांना पुण्यातील घटनास्थळी नेण्यात येऊ शकते. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

बुधवारी न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांची सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आज सकाळी नितेश राणे यांना चौकशीकरिता कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. याचठिकाणी नितेश राणे यांच्या समवेत राकेश परब यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. परंतु, आता पोलिसांनी नितेश राणे यांना पुण्यात नेले तर या प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षातील काही नेत्यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. नितेश राणे यांच्यावर होणारी कारवाई ही राजकीय हेतूने केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच पोलीस देखील दबावाखाली आहेत असंही म्हटले आहे. तसेच न्यायालयाबाहेर नितेश राणे यांची गाडी अडवण्याच्या प्रकरणावरून झालेल्या गदारोळानंतर निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकारही चुकीचा असल्याचे तेली यांनी सांगितले आहे.

Web Title : Possibility to take Nitesh Rane to Pune for further investigation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here