Home Accident News अहमदनगर: ट्रॅक्टरला विद्युत लाईनची तार चिकटली; महिला मजुराचा मृत्यू

अहमदनगर: ट्रॅक्टरला विद्युत लाईनची तार चिकटली; महिला मजुराचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: विद्युत लाईनची तार खाली लोंबकळलेली असल्याने या तारेचं स्पर्श ट्रॅक्टरला झाल्याने जोरदार झटका बसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू.

power line stuck to the tractor Death of a female laborer

अहमदनगर : ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना रस्त्यावरून गेलेली विद्युत लाईनची तार खाली  लोंबकळलेली असल्याने या तारेचं स्पर्श ट्रॅक्टरला झाला. यामुळे जोरदार झटका बसल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. हातवळण- बनपिंपरी रस्त्यावर ही घटना घडली.

अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे मजूर २४ मार्चला रात्री दहा वाजता ऊसतोडचे काम संपून गावाकडे निघाले होते. यावेळी सर्व मजुरांनी ट्रॅक्टरमध्ये सर्व संसाराचे साहित्य भरून मार्गस्थ झाले होते. हातवळण – बनपिंपरी या  मार्गाने जात असताना ट्रॅक्टरला महावितरणच्या मेन लाईनला तार चिकटली. यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका मजुर ,महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत फुलाबाई नरसिंह जाधव या महिला मजुराचा मृत्यू झाला तर अंकुश रोहिदास जाधव हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: power line stuck to the tractor Death of a female laborer

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here