Home अहमदनगर आ. प्राजक्त तनपुरें यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ईडीची समन्स

आ. प्राजक्त तनपुरें यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ईडीची समन्स

Ahmednagar news: ईडीने १३ कोटी ३७ लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला.

Prajakta Tanpuren's trouble is likely to increase, ED summons

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने १३ कोटी ३७ लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना १२ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले

या प्रकरणात प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांसह प्रसाद शुगर अलाईड अग्रो प्रॉडस्टस लीआणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा लि. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच 12 जानेवारी 2024 रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. पदाचा दुरुपयोग करत दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर  ईडीकडून ईसीआयआर दाखल करण्यात आलाय.

प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना हा कमी किंमतीत विकल्याचा आरोप केलाय. राम गणेश गडकरी या कारखान्यासाठी  26 कोटी 32 लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु प्राजक्त तनपुरे यांनी 13 कोटी 37 लाखांमध्ये हा कारखाना विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी पदाचा दुरपयोग केला असून दवाब देखील टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. 

Web Title: Prajakta Tanpuren’s trouble is likely to increase, ED summons

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here