Home नाशिक सिन्नर: मुख्याध्यापक, शिपाई लाचेच्या जाळ्यात

सिन्नर: मुख्याध्यापक, शिपाई लाचेच्या जाळ्यात

Nashik Bribe Crime: मुख्याध्यापक, शिपाई दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक.

Headmaster constable caught taking bribe

नाशिक: रामनगर (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या आवारात पाच हजार रुपयांची लाच शिपायामार्फत स्वीकारणारा मुख्याध्यापक संशयित सुनील वसंत पाटील (वय ५४) याच्यासह शिपाई बाळू हिरामण निकम (५५) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मुख्याध्यापक पाटील हे प्राथमिक आश्रमशाळा, रामनगर येथे कार्यरत आहेत.

तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ पर्यंतच्या वेतनाच्या फरकाबाबतची फाइल मंजूर करून फरकाची रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी ३१ जुलैला केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती. पथकाने शहानिशा करीत खात्री पटविली.

यानुसार पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक राजेंद्र सानप, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, विलास निकम आदींनी मंगळवारी (ता. १३) आश्रमशाळेच्या आवारात सापळा रचला. या वेळी तक्रारदाराला निकम यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगून पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात पंच व साक्षीदारांबरोबर रक्कम स्वीकारली असता पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Headmaster constable caught taking bribe

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here