येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ
Pune Crime: येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याचा चार जणांनी खून (Murder) केल्याची घटना.
पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याचा चार जणांनी खून केल्याची घटना गुरुवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास सर्कल दोन मधील बरॅक एकच्या आवरात घडली. आरोपींनी केस कापण्यासाठी वापरण्यात येणारी कात्री व दरवाजाच्या बिजागिरीच्या तुकड्याने वार करुन कैद्याचा खून केला. पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मुरे, गणेश हमुमंत मोटे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महेश चंदनशिवे 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात आहे. त्याला सर्कल दोन मधील बरॅक एकमध्ये ठेवण्यात आले होते.
गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अनिकेत समदूर, महेश माने, आदित्य मुरे आणि गणेश मोटे या चार कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून महेश चंदनशिवे याच्यावर हल्ला केला. आरोपींनी खून करण्यासाठी केस कापण्यासाठी वापरण्यात येणारी कात्री व दरवाजाच्या बिजागरीच्या तुकड्याचा वापर केला. चंदनशिवे याच्या मानेवर व पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. कारागृहातील डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करून पुढील उपचारासाठी कारागृहातील रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित केले.
Web Title: Prisoner’s murder in Yerawada jail, huge excitement
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App