Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Ahmednagar News: गणेशोत्सव संपल्यानंतर आता पितृ पंधरवडा सुरू झाला, अहमदनगर जिल्ह्यात मात्र १२ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला.

Prohibitory order applicable till this date in Ahmednagar 

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पितृपक्षात देखील प्रतिबंधात्मक आदेश लागू केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जमाव आणि शस्त्रबंदी केली जाते. शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही.

यावेळी कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगता येणार नाहीत. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे यावर बंदी असेल. सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे.

सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणुका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणुका असे कार्यक्रम तसेच सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

 सण-उत्सवांचा काळ, आंदोलने किंवा निवडणुका असल्यास कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येतो. गणेशोत्सव संपल्यानंतर आता पितृ पंधरवडा सुरू झाला आहे. या काळात शक्यतो कुठलेही कार्यक्रम अगर उपक्रम न घेण्याकडे अनेकांचा कल असतो. असे असूनही अहमदनगर जिल्ह्यात मात्र १२ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

Web Title: Prohibitory order applicable till this date in Ahmednagar 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here