अहिल्यानगर: कुंटणखान्यावर छापा, दोन महिलांची सुटका
Breaking News | Ahilyanagar: सोनल गार्डन बार रेस्टॉरंट व लॉजिंगवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. (Prostitute business in hotel )
अहिल्यानगर : बेलवंडी (ता. श्रीगोंदा ) येथील सोनल गार्डन बार रेस्टॉरंट व लॉजिंगवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल गेणा सोनलकर (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, बेलवंडी परिसरात काही इसम हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बेलवंडी येथील सोनल गार्डन व रेस्टॉरंटवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर दोन महिला आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर महिलांची सुटका करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीकडून मोबाइल व रोकड, असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, संदीप दरंदले, संतोष खैरे, रोहित यमूल आदींच्या पथकाने केली.
Web Title: Prostitute business in hotel two woman rescue
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study