Home क्राईम हॉटेलच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;  पोलिसांचा छापा, महिलांची सुटका  

हॉटेलच्या नावाखाली वेश्या व्यवसाय;  पोलिसांचा छापा, महिलांची सुटका  

Sangli Crime: हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर (Prostitution) पोलिसांनी छापा टाकला.

Prostitution business under the name of the hotel Police raid, the rescue of women

सांगली: सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एजंटला आणि हॉटेल मालकाला अटक करण्यात आली. एजंट शोएब आणि लॉज चालक गुरुप्रसाद कृष्णमूर्ती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, महिला एजंट स्वाती ही फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्ह्यात जबरदस्तीने महिलांकडून वेश्या व्यवसाय करायला लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांना सांगलीतील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीनुसार, बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. यानंतर सापळा रचून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हॉटेल स्टार पॅलेसवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणाहून दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हॉटेल मॅनेजर शोएब मिस्त्री आणि हॉटेल चालक गुरुप्रसाद शेट्टी या दोघांना अटक केली. तसेच दोन महिलांची यातून सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Prostitution business under the name of the hotel Police raid, the rescue of women

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here