Home पुणे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

Prostituition Business: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने कारवाई.

Prostitution business under the name of spa center busted, two women freed

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने कारवाई करत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा  दाखल करुन दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन मॉल  येथील ब्ल्यू स्टोन स्पा सेंटर येथे करण्यात आली.

राकेश शिंदे (वय-25 रा. पवार चाळ, दापोडी), अक्षय बनकर (वय-30), महिला आरोपी (अंदाजे वय 35) यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार सुनील जगन्नाथ शिरसाट यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हे आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स स्पा नावाने स्पा सेंटर चालवत होते. मात्र आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पीडितांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत स्वत:ची उपजिवीका भागवत होते. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या महितीची खात्री केली असता ब्ल्यू स्टोन स्पा सेंटरमध्य स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. तसेच तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान करीत आहेत.

Web Title: Prostitution business under the name of spa center busted, two women freed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here