थाई महिलांकडून देहव्यापार; हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
Breaking news | Thane Sex Racket: ठाण्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात करण्यात यश.
ठाणे: ठाणे पोलिसांना ठाण्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात करण्यात यश आले आहे. थाई महिलांच्या साथीने हे सेक्स रॅकेट सुरू होतं. या प्रकरणी पोलिसांनी बागदी अब्दुल्ला नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. थाई महिलांना बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवून देण्यासाठी मदत करण्याचं त्याने आश्वासन दिलं होतं. त्या बदल्यात तो या महिलांकडून शरीर विक्रयचा धंदा करून घेतल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
बागदी अब्दुल्ला मुगेद साद (वय 42) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना गेल्या आठवड्यातच या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मानवी तस्करी विरोधी पथकाच्या एका टीमला एका हॉटेलात पाठवलं. या टीमने हॉटेलात छापेमारी केली. यावेळी एका 44 वर्षीय थाई महिलेला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.
या हॉटेलमधून तीन थाई महिलांची सुटका करण्यात आली आहे. या चारही महिलांची चौकशी केल्यानंतर अब्दुल्ला सादने त्यांना बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्ड मिळवून देण्यात मदत केली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अब्दुल्ला मुगेद साद आणि या चारही थाई महिला पासपोर्ट आणि व्हिजाचा अवधी संपल्यानंतरही भारतात राहत होते. या सर्वांविरोधात पोलिसांनी विदेशी नागरिक अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Prostitution by Thai women High profile sex racket busted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study