अकोले: आंदोलकांचा निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, मोठे आंदोलनाचा इशारा
Nilwande Canal: डाव्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती असून यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान.
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागासाठी सध्या आवर्तन सुरू आहे. डाव्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती असून यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे आवर्तन तातडीने बंद करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करत आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिता भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कालवा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात कालव्याजवळ कालवा फोडण्याचा प्रयत्न देखील आंदोलकांनी केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना रोखल्याने आंदोलकांनी कालव्या शेजारीच आंदोलकांना ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांची चर्चा केली. सध्या सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावी. कालव्यांची काम पूर्ण करावी त्यानंतरच पाणी सोडावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
52 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्यांची काम पूर्ण झाली. कालव्यांची कामे पूर्ण होताच अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करत डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं. मात्र अकोले तालुक्यातील कालव्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप करत अस्तरीकरण व सिमेंट काँक्रीटचे काम प्रलंबित असताना हे पाणी सोडल्याने कालव्याला गळती होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले असले तरी पुढील काळात भरपाई मिळाली नाही आणि कामे झाली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Web Title: Protesters attempt to break the Nilawande canal
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App