Home Crime News बापरे ! ‘पबजी’ गेमच्या नादात मुलाने उडवले १७ लाख रुपये

बापरे ! ‘पबजी’ गेमच्या नादात मुलाने उडवले १७ लाख रुपये

pub-g-crime-news-boy-spends-rs-17-lakh-on-pubg-game

PubG Crime News : आपली मुलं मोबाईल वापरतात हि बाब आता चिंतेचीच नाही तर मोठ्या नुकसानीची देखील बनू लागली आहे. मुलं मोबाईलच्या अति आहारी गेल्याने अनेकांना नुकसान झेलावे लागले आहे. यात लोकप्रिय मानला जाणारा पब्जी या गेमचं व्यसन अनेकांना आहे. या खेळाच्या नादात मुलं मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटके देत असल्याच्या घटना वाढू लागलेल्या आहेत. असाच एक प्रकार चंदीगडमध्ये समोर आला आहे.

चंदीगडच्या पीपलीवाला या शहरातील एका औषधविक्रेत्याला याचा मोठा फटका बसला आहे. या व्यापाऱ्याच्या मुलानं पब्जी, फ्री फायर आणि कार रेसिंग गेमच्या नादात तब्ब्ल 17 लाख रुपये उडवले आहेत.आणि यासाठी त्याने ही सर्व रक्कम आपल्याच घरातून चोरी केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. यामुळे व्यापाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणात व्यापाऱ्याच्या मुलाच्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. यात मुलाचा आतेभाऊ आणि मित्राचा देखील समावेश आहे.

औषध व्यापाऱ्याच्या मुलानं घरातून कोणाच्याही कोणाच्याही नकळत रक्कम चोरुन दोस्तांसोबत जात तीन आयफोन, कपडे आणि बूट खरेदी केले. एवढंच नाही तर त्यांनी विमानाची सैर देखील केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांना या प्रकरणात दोषी आढळल्याने बाल सुधारगृहात पाठवलं आहे. तर यातील 27 वर्षीय आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात 10 लाख 22 हजार 500 रुप्यांसह तीन आयफोन जप्त केले आहेत.

Web Title : Boy spends Rs 17 lakh on ‘PubG’ game

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here