Pune Accident : पुण्यातील येरवडा जेल परिसरात एका इमारतीच्या बेसमेंटसाठी भूमिगत स्लॅबचे काम सुरू होते. मात्र हे काम सुरू असतानाच वजनदार लोखंडी छत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत छताखाली दबून सात कामगार ठार झाले आहेत. तर काही कामगार जखमी झाले असल्याचे समजते.
पुणे शहरातील नेस वाडिया कॉलेजजवळ एका इमारतीचे काम सुरू होते. यावेळी लोखंडी सळया असलेले छत कोसळल्याने त्याखाली कामगार अडकले गेले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करीत १० ते १२ जणांना लोखंडी छताखालून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. तसंच या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे.
Web Title : Pune Accident : Seven workers were killed in an accident while the building was under construction