Home Crime News Pune Suicide : पिंपरीत गळफास घेऊन नवविवाहित महिलेची आत्महत्या

Pune Suicide : पिंपरीत गळफास घेऊन नवविवाहित महिलेची आत्महत्या

Pune Suicide

Pune Suicide : पिंपरी (Pimpri) शहरातील वाकड या ठिकाणी एका विवाहित महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यातच महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या महिलेनं नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली? हे अद्याप समोर आलेलं नसून पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

शीतल रोहीत पवार असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शीतल याचं मागील वर्षीच जुलै 2021 मध्ये वाकड येथील रोहीत अशोक पवार याच्याशी लग्न झाले होते. रोहीत आयटी पार्कमध्ये नोकरी करतो. तर अलीकडेच शीतल आपल्या माहेरी गेली होती. रविवारी माहेराहून ती आपल्या सासरी परतली. सोमवारी पती रोहित कामाला गेल्यानंतर शीतलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कामावर गेल्यानंतर पती रोहीत यांनी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्यांचं शेवटचं बोलणं झालं होतं. त्यानंतर बाराच्या सुमारास रोहितने पुन्हा पत्नीला फोन केला असता पत्नीने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रोहितने आपल्या शेजारी फोन करून विचारणा केली.

शेजारील महिलेनं घरी जाऊन दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी याची माहिती पती रोहित यांना दिली. यानंतर चिंताग्रस्त होत रोहित घरी आला व त्याने शीतलला दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र तरीही आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे रोहीतने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी शीतल घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करीत घटनेची नोंद केली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध सध्या पालिसांकडून घेतला जात आहे.

Web Title : Newlywed woman commits suicide by hanging in Pimpri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here