Home संगमनेर संगमनेर: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

संगमनेर: राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

Breaking News | Sangamner Accident: संगमनेर तालुक्यातून ताफा जात असताना ताफ्यातील भरधाव कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला धडकली.

Radhakrishna Vikhe Patil's convoy car met with accident

संगमनेर: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील कारला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. संगमनेर तालुक्यातून ताफा जात असताना ताफ्यातील भरधाव कार समोरून येणाऱ्या एका वाहनाला धडकली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण विखे पाटलांचा ताफा शुक्रवारी रात्री समनापूर गावातून संगमनेरकडे जात होता. त्याचवेळी ताफ्यातील पोलिसांची कार समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली. अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य करण्यात आले. दोन्ही जखमी पोलिसांना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Radhakrishna Vikhe Patil’s convoy car met with accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here