मुकादामानेच केले ऊस तोडणी मजुराचे अफहरण
राहता | Rahata: सोलापूर येथील मुकादमाने उस तोड कामगाराच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या मजुराचे अपहरण केल्याची घटना राजूर ता. राहाता येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी कि, सध्याच्या गाळप हंगामासाठी महेबूब मुलानी याने राजुरी येथील वसंत संपत जाधव वय ५० यांच्याकडे काही मजुरांची मागणी केली. त्यावरून जाधव यांनी खिर्डी येथील काही तोडणी मजुरांशी मुलानी यांच्याशी भेट घालून दिली. मुलांनी याने मजुरांना १२ हजार रुपयांची उचल दिली परंतु मजूर कामावर गेले नाही. त्यानंतर वसंत जाधव इने २० डिसेंबर रोजी वसंत जाधव यांच्या घरी येऊन मारहाण केली व जबरदस्तीने कारमध्ये बसून नेले व जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव यांच्या मुलाला फोन करून जाधव यांच्या सोडवनुकीसाठी चार लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
मजुराची पत्नी छाया वसंत जाधव यांनी पोलीस फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलसांनी महेबूब मुलानी याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार ज्ञानदेव मरभळ हे करीत आहेत.
युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे व कृष्णा बडाख यांनी मुलानीशी संपर्क केला असता पैसे दिल्याशिवाय जाधव यांना सोडण्यास त्याने नकार दिला आहे.
Web Title: Rahata Sugarcane harvesting worker abducted by Mukadama