Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, शाळेत गेली अन…

अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण, शाळेत गेली अन…

Breaking News | Ahmednagar: शाळकरी अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना.

Rahuri Abduction of a minor girl

राहुरी : एका शाळकरी अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली. संबंधित अल्पवयीन मुलगी राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत – आहे. दि. ३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती राहुरी येथे शाळेत गेली होती.

 शाळा दुपारी १२ वाजता सुटते; परंतु संध्याकाळी सहा वाजूनही मुलगी घरी न आल्याचे मुलीच्या आईने आपल्या पतीस सांगीतले. दोघा पति-पत्नीने मुलीचा शोध घेतला; परंतु मुलगी आढळून आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात – व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता – (बीएनएस) कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rahuri Abduction of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here