Home Ahmednagar Live News बोकड कापण्याच्या सुरीने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न

बोकड कापण्याच्या सुरीने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Rahuri Crime Attempt to kill a goat with a knife

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याची सुरीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने फिर्याद दिली असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 11 जानेवारी रोजी कानडगाव येथे आरोपी यांनी बोकड कापण्याच्या कारणावरून संगनमत केले आणि सलमान सय्यद याला बोकड कापण्याच्या सुरीने जबरदस्त मारहाण केली.

या घटनेत सलमान सय्यद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी प्रवरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सलमानच्या जबाबावरून आरोपी कासमभाई सत्तारभाई सय्यद, शकील कासमभाई सय्यद, हरून कासमभाई सय्यद, मोसिन कासमभाई सय्यद सर्व रा. कानडगाव या चारजणांवर राहुरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rahuri Crime Attempt to kill a goat with a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here