Home अहमदनगर अहमदनगर:  तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर:  तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: अविवाहित तरुणाने त्याच्या घरा शेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Rahuri Youth committed suicide by hanging

राहुरी: तालुक्यातील टाकळीमिया येथील अविनाश रमेश कवाणे या अविवाहित तरुणाने त्याच्या घरा शेजारील कांद्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अविनाश रमेश कवाणे (वय २३) हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील कारखाना रस्ता परिसरात त्याच्या कुटुंबासह राहतो. काल दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी अविनाश नेहमीप्रमाणे सकाळी उठला. नित्यक्रम आवरल्यानंतर सकाळी आठ वाजे दरम्यान अविनाश याने त्याच्या घराशेजारी असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याच्या नातेवाईकांनी अविनाश याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. परिसरातील काही जणांनी अविनाश याला ताबडतोब खाली उतरवून रुग्णवाहीकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

दुपारी उशिरा अविनाश याचे शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अविनाश कवाणे याने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Rahuri Youth committed suicide by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here