अहमदनगर: कॅफेवर छापा, मुला-मुलींसाठी कंपार्टमेंट; मालक झाले फरार
Breaking News | Ahmednagar: कॅफेच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते, पोलिसांचा छापा.
अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील लव्ह बर्डसवर, तर कोतवाली पोलिसांनी सारसनगर येथील रिचकिंग कॅफेवर छापा टाकत साहित्य जप्त केले. याप्रकरणी कामगारांवर कारवाई करण्यात आली असून, मालक फरार आहेत. पोलिसांनी कॅफेवर केलेली ही दुसरी कारवाई असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील चाणक्य चौक येथे रिचकिंग कॅफेवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी छोटे छोटे कम्पार्ट तयार करून त्याला बाहेरून पडदे लावले होते. अंधाऱ्या खोलीत बाकडे ठेवून मुला मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले होते. दुसरी कारवाई तोफखाना पोलिसांनी पाइपलाइन रोडवरील श्रीराम चौकातील लव्ह बर्डस कॅफेवर केली. त्यावेळी तिथेही असेच आढळून आले होते. यापूर्वीही पोलिसांनी विविध कॅफेवर छापे टाकले. मात्र शहरात कॅफे सुरूच असून, मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिसांना कारवाईत काहीच हाती लागत नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नगरमधील सावेडी, मध्यवर्ती शहर आणि बुरुडगाव, सारसनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. कारवाई करून कॅफे बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता.
मात्र कॅफे पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक संपलाय का?, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत.
Web Title: raid cafe, compartment for boys and girls The owner absconded
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study