अहमदनगर: कॅफेवर छापा तीन कॅफेचालकांविरुद्ध गुन्हा दाखल, मुला-मुलींना चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट
Breaking News | Ahmednagar: चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेचालक-मालकांविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल.
अहमदनगर : शाळा- महाविद्यालयातील मुला-मुलींना बसण्याकरिता व चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेचालक-मालकांविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नगर शहरात कॅफेचालकांविरुद्ध चांगलीच मोहीम उघडली आहे. मुला-मुलींना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचा आरोप ठेवत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी रात्री नगर शहरात छापे टाकले. यामध्ये द लव्हबर्ड्स कॅफेचा मालक ऋषिकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर, २) ऑर्जेनोचा मालक अविनाश विलास ताठे (रा. पंपिंग स्टेशन रोड, सावेडी अहमदनगर, गोल्डन फ्लेम कॅफेचा मालक सार्थक अनिल गंधे व तेथे काम करणारा शिबान मुअंदे (रा. बालिकाश्रम रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कॅफेत शाळा व कॉलेजमधील मुला-मुलींना बसण्याकरिता व चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून दिली, असा आरोप त्यांच्यावर आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी छापा टाकून कारवाई केली. या पथकात हेड कॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, संतोष ओव्हाळ, गणेश चव्हाण, सचिन जाधव, हेमंत खंडागळे, सचिन मिरपगार, सागर द्वारके आदींचा समावेश होता.
Web Title: Raid on cafe, case filed against three cafe operators, separate
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study