अहमदनगर: हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा, दोन महिलांची सुटका
Ahmednagar | Shrirmpue | श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा (Raid on high profile prostitution business) टाकून कारवाई करण्यात आली आहे. डीवायएसपी संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यावेळी दोन पिडीत महिलांची सुटका व दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.
आज गुरुवारी डीवायएसपी संदिप मिटके श्रीरामपूर विभाग, अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर (लॉजमालक) हा हायप्रोफाइल महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली.
त्यानुसार डीवायएसपी संदिप मिटके यांनी PI सानप श्रीरामपूर शहर , व अंमलदार यांचे पथक तयार करुन श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी भगवान विश्वासराव क्षत्रीय वय 68 रा वैभव लॉज वॉर्ड न 5 श्रीरामपूर ( लॉजमालक )व विश्वास रामप्रसाद खाडे वय 26 रा कांदा मार्केट,शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर् यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके ,PI सानप, Api विठ्ठल पाटील,PN करमल पो कॉ नितीन शिरसाठ, पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार म पो कॉ सरग, गलांडे आदींनी केली.
Web Title: Raid on high profile prostitution business frees two women