Home Accident News चोरी करण्याच्या हेतूने रेल्वेत चढला अन झाले असे काही

चोरी करण्याच्या हेतूने रेल्वेत चढला अन झाले असे काही

Railway theft Accident happened 

श्रीरामपूर | Accident: रात्रीच्या वेळी लुटमार करण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. चोरी करण्याच्या उद्देशाने रेल्वेत गेलेल्या तरुणाने पुन्हा बाहेर उडी मारल्याने दुसर्‍या रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल पहाटे 2 वाजेच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. मुजाहिद मस्तान शेख (वय 20, रा. फकिरवाडा, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर) असे या मयत तरुणाचे नाव आहे. हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

काल सकाळी मुजाहिद मस्तान शेख याचा मृतदेह त्याच्या घरात फकीरवाडा येथे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस नाईक संजय पवार, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे त्याच्या घरी गेले असता तेथे मुजाहिद शेख याचा मृतदेह दिसून आला. त्याबाबतच्या गोपनिय माहितीनुसार पोलिसांनी जुबेर हरुण शेख (वय 20, रा. डावखर रोड, वॉर्ड नं.6, श्रीरामपूर), इरफान मैनुद्दिन सय्यद उर्फ काझी उर्फ इप्या (वय 18, रा. मिल्लतनगर वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर), अरबाज जब्बर शहा (वय 22, रा. फकिरवाडा वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर) तसेच आदम युसूफ शहा (वय 25, रा. काझीबाबा रोड, वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर) यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. 

त्यांचेकडून पोलिसांना माहिती मिळाली की, मुजाहिद शेख तसेच जुबेर शेख, इरफान मैनुद्दिन सय्यद उर्फ काझी उर्फ इप्या व अरबाज जब्बर शहा हे चोरी करण्यासाठी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. त्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अहमदनगरकडून ट्रॅक नंबर 1 वर महाराष्ट्र एक्सप्रेस आली. त्यावेळी मुजाहिद शेख चोरी करण्याच्या उद्देशाने रेल्वेच्या बोगीत घुसला. मात्र त्याचवेळेस रेल्वेतील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने परत त्याच दरवाजाने त्याने बाहेर उडी घेतली. त्यावेळी मनमाडकडून अहमदनगरकडे जाणार्‍या हबीबगंज एक्सप्रेस रेल्वेने त्यास धडक दिली. त्यानंतर आरबाज याने आदम युसूफ शहा यास रिक्षा घेऊन रेल्वे वसाहतीच्या रोडजवळ बोलविले. तोपर्यंत इतरांनी त्याला रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे वसाहतीच्या रोडलगत आणले.

मुजाहिद शेख याचा मृतदेह रेल्वे वसाहतीजवळ रोडवर पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुजाहिदच्या कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन मुजाहिद याला उपचारासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे नेेले असता उपचारपुर्वीच त्याचा मृत्यू झाला. . श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरीत इतरांना ताब्यात घेतल्याने या घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Railway theft Accident happened 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here