अहमदनगर: अवकाळीचा आवाज ! वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट
Breaking News | Ahmednagar Rain: गुरूवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. ढगांच्या गडगटासह जोरदार वादळी वारे वाहिले.
अहमदनगर: नगर शहर आणि एमआयडीसी परिसरात गुरूवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नगर शहरात या पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, जोरदार वादळ झाले. एमआयडीसी परिसरात ढगांच्या गडगटासह जोरदार वादळी वारे वाहिले. यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
एमआयडीसी परिसरात गुरूवारी सांयकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसाला सुरूवात झाली. यावेळी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात ढगांचा गडगटात सुरु होता. सुमारे दहा ते १५ मिनीटे हा प्रकार सुरू होता. जोरदार वाऱ्यामुळे मोठ-मोठी झाडे जागेवर पिळून निघत होती. दहा मिनीट पावसाच्या सरी कोसळ्यानंतर वादळ शांत झाले. मात्र, अधूनमधून ढगांचा गडगडात सुरू होता. हा पाऊस एमआयडीसी, निंबळक यासह पारनेर तालुक्याच्या दिशेने दिसत होता. भारतीय हवामान विभागाने गुरूवारी नगर जिल्ह्यात यलो अर्लट जारी केला होता. त्यानुसार काल दिवसभर उन्हाची तीव्रता कमी दिसत होती. यासह आकाशात ढग जमा होताना दिसत होते. त्यानंतर सायंकाळी जोरदार वादळी वारे वाहिले. हा पाऊस नागापूरच्या पुलापर्यंत होता. त्यानंतर नगर शहरात पावसाचे वातावरण तयार झाले होते.
गेल्या १५ दिवसांपासून नगर शहरासह परिसरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारा सातत्याने चढताना दिसत होता. उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होत होती. मात्र, गुरूवारी सायंकाळी वातावरणात बदल झाला आणि काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळ्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
Web Title: Rain and Thunderstorm with stormy winds
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study