Home महाराष्ट्र महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची विश्रांती, त्यानंतर धो-धो पावसाला सुरवात होणार- पंजाबराव

महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची विश्रांती, त्यानंतर धो-धो पावसाला सुरवात होणार- पंजाबराव

Panjabrao Dakh Rain Update: 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. याचा परिणाम म्हणून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार.

Rain break in Maharashtra till 'this' date, then intermittent rain will start Panjabrao Dakh

Rain Update: जुलैमध्ये महाराष्ट्रात जोराचा पाऊस झाला. अगदी नदी, नाले, ओढे भरून वाहू लागलेत. छोट्या-मोठ्या धरणांमध्येही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जुलैमध्ये काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला एवढा जबरदस्त पाऊस झाला.

राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळाली. नंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस ओसरला. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले.

यामुळे अनेकांच्या माध्यमातून पाऊस आता कधी विश्रांती घेणार असा सवाल उपस्थित केला जात होता. खरीप हंगामातील पिकांना आता सूर्यदर्शनाची गरज आहे. यामुळे पावसाचा जोर कधी ओसरणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून होते. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

अनेक ठिकाणी सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पण आता पावसाचा जोर थांबला आहे. पंजाबरावं डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे.

आज 12 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या सूर्यदर्शनाची शक्यता आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे ढगाळ हवामान राहणार नाही असा अंदाज आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्लाही दिला जात आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव या जिल्ह्यात 19 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शनाची शक्यता आहे.

पण, राज्यातील कोकण विभागात आणि खानदेश, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 20 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.

20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. याचा परिणाम म्हणून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.

Web Title: Rain break in Maharashtra till ‘this’ date, then intermittent rain will start Panjabrao Dakh

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here