Bhandardara Dam Rain: भंडारदरा धरणात 361 दलघफू नवीन पाण्याची आवक, निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळी 7317 दलघफू झाला.
भंडारदरा: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. भंडारदरा पाणलोटात रविवारच्या तुलने काल सोमवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असलातरी गत 36 तासांत पावसाने तुडूंब असलेल्या भंडारदरा धरणात 361 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. हे सर्व पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. ते निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळी 7317 दलघफू झाला होता.
घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पाऊस झाल्याने काल रविवारी सायंकाळी 6 वाजता या धरणातून 3256 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर 7.30 वाजता हा विसर्ग 4400 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने हा विसर्ग 2647 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला. दरम्यान, भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग तसेच कृष्णवंतीचे पाणी जमा होत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे.
नगर जिल्ह्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात काल रविवारी दिवसभर हलक्या सरी कोसळत होत्या. तर सोमवारी काहीसा जोर वाढला. रविवारी सायंकाळी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 502 क्युसेक होता. तो काल सोमवारी 977 क्युसेकपर्यंत वाढला. मुळा धरणातील पाणीसाठा 20425 दलघफू होता. धरणातून 1625 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
Web Title: Rain continues in Bhandardara catchment area
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App