Home Maharashtra News Weekend Plan : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Weekend Plan : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Rain in Maharashtra

मुंबई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात थंडीची लाट उसळली आहे. मात्र त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी हलक्या तसेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्याना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

पुढचे दोन दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह थंडीची लाट कायम असणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी काही भागात हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कोकणासहित दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये थंडी कमी प्रमाणात जाणवणार आहे. त्यानंतर मात्र काही ठिकाणी पावसाची बरसात होण्याची शक्यता आहे.

पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. इतर भागात हवामान खात्याने इशारा जारी केला नाही. परंतु विकेंडला ढगाळ हवामान असणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडला विशेषतः कोकणात फिरायला जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

Web Title : Weekend Plan: Rain showers will fall in this district of the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here