Weather Update : राज्यातल्या काही भागांमध्ये थंडीची लाट सध्या कायम आहे. मात्र असे असले तरी येत्या काही दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी कायम आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत असंच वातावरण कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 3 फेब्रुवारीपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असं देखील हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, थंडीचा जोर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होणार आहे. तर राज्यातल्या धुळ्यात सर्वात कमी 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे.
राज्यातील इतर प्रमुख शहरे ज्यात अकोला 10.1 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 9.2 अंश सेल्सिअस, गोंदियामध्ये 7.8 अंश सेल्सिअस, नागपूर 7.9 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.6 अंश सेल्सिअस, नांदेड 9.6 अंश सेल्सिअस, परभणी 10.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूर 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Web Title : Rain warning in some parts of Maharashtra