घरफोडीच्या तयारीत असणाऱ्या आरोपीस राजूर पोलिसांनी केले जेरबंद
Ahmednagar | Rajur News: घरफोडीच्या तयारीत असणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात (Arrested).
अकोले: कोल्हार घोटी रोडवर राजूर येथे घरफोडीच्या तयारीत असणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. राजूर पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या घरफोडीतील आरोपीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राजूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी दिली. अनिल भीमा मडके (रा. गर्दणी, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस पथक संगमनेर उपविभागात रात्रगस्त करीत असताना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास कोल्हार घोटी रोडवर राजूर येथे एक जण अंधारात वावरताना दिसला. त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल भीमा मडके असे सांगितले. त्याचेकडे अपरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेतली. त्याच्याकडे घरफोडीत वापरण्यात येणारी लोखंडी पक्कड मिळाली. त्याबाबत पंचनामा करून पो. कॉ. अशोक गाढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Rajur police arrested the accused who was preparing to burglarize