Home महाराष्ट्र Rajya Sabha Election 2022 Live:  अखेर भाजपाची खेळी यशस्वी, धनंजय महाडीक विजयी

Rajya Sabha Election 2022 Live:  अखेर भाजपाची खेळी यशस्वी, धनंजय महाडीक विजयी

Rajya Sabha Election 2022 Live Dhananjay Mahadik wins

मुंबई | Rajya Sabha Election 2022 Live: अखेर फडवणीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपला अपक्ष  आमदार फोडण्यात यश आले आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असे ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थाने महत्वाचा आहे.

महाडीक (Dhananjay Mahadik wins) यांच्या विजयानंतर यशस्वी ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती, असे ते म्हणाले.

राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला होता. पण तो कौल आमच्या पाठीत सुरा खुपसून काढून घेतला होता. पीयूष गोयल, बोंडे यांना प्रत्येकी ४८ मते मिळाली. धनंजय महाडीक यांना ४१.५६ मते मिळाली. ती संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त आहेत. जे मत शिवसेनेचे बाद झाले, ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक यांना कोर्टानं परवानगी दिली असती तरी आमचा विजय झाला असता. आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. विजयाची मालिका सुरू झाली आहे.

पहिल्या पसंतीक्रमात मतांमध्ये महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात चुरस होती. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत धनंजय महाडीक यांनी बाजी मारली. तर संजय पवार यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

मिळालेली मते:

प्रफ्फुल पटेल – ४३ मते

शिवसेनेचे संजय राऊत – ४२ मते

पीयूष गोयल – ४८ मते

अनिल बोंडे – ४८ मते

प्रतापगढी – ४४ मते

धनंजय महाडीक यांना ४१.५६

Web Title: Rajya Sabha Election 2022 Live Dhananjay Mahadik wins

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here