अहमदनगर: पावणेदोन लाखांची पैशांची बॅग घेऊन पळाला अन…
Ahmednagar News: वजन काट्यावर कारमधून पावणेदोन लाखांची बॅग चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली.
अहमदनगर: शेवगाव येथील वजन काट्यावर कारमधून पावणेदोन लाखांची बॅग चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.२३) अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये जप्त करण्यात आले असून, त्याला नित्यसेवा हॉस्पिटल येथून अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपीविरोधात तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. प्रशांत संजय ससाणे (वय ३३, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर, हल्ली रा. रामनगर, शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी शेवगाव तालुक्यातील दादेगाव येथील राम श्रीधर देवढे हे शेवगाव येथील वजन काट्यावर गेले होते. त्यांनी त्यांच्याकडील १ लाख ७५ हजारांची बॅग कारमध्ये ठेवलेली होती. ही बॅग चोरट्याने चोरून नेली. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला. तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा वरील आरोपीने केल्याचे समोर आले. तो शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटल चौकात येणार आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील संतोष लोढे, रवींद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: ran away with a bag of two lakhs of money and Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App