Home अहिल्यानगर अहिल्यानगर: भाड्याने राहत असलेल्या महिलेवर अत्याचार; तरुणावर गुन्हा

अहिल्यानगर: भाड्याने राहत असलेल्या महिलेवर अत्याचार; तरुणावर गुन्हा

Breaking News | Ahilyanagar Rape Case: भाड्याने राहत असलेल्या एका महिलेस धमकावत तिच्यावर दीर्घकाळ बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजस्थानातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Rape against rent relief women

अहिल्यानगर:  शहरातील एका उपनगरात भाड्याने राहत असलेल्या एका महिलेस धमकावत तिच्यावर दीर्घकाळ बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या राजस्थानातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत उपनगरातील एका घरात भाड्याने राहत होत्या. याच दरम्यान देवीलाल बोराराम चौधरी (वय ३४, रा. नागौर, राजस्थान) याने लग्नाचे आमिष दाखवून व तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा दबाव टाकून तिच्या इच्छेविरूध्द वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. चौधरी याने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेनं अखेर पोलिसांकडे धाव घेतली. मंगळवारी (१३ मे) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

Breaking News: Rape against rent relief women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here