Rape Case: बाजार समिती उपसभापतीच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा
पाथर्डी | Rape Case: पाथर्डी बाजार समितीचा भूखंड देण्याचे अमिष दाखवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींच्या पतीने महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 18 व 22 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र विलास गर्जे (रा. पांगोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तो पाथर्डी बाजार समितीच्या उपसभापती यांचा पती आहे. याबाबत कोल्हार येथील पिडीत महिलेने तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाथर्डी बाजार समितीची भुखंड वाटपाबाबत एका वृत्तपत्रातील जाहीरात वाचुन पिडीत महीलेने भुखंड मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्ज दाखल केला होता. अर्जावर दिलेल्या फोन नंबर वर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीचा पती राजेंद्र विलास गर्जे यांने फोन केला. माझी पत्नी बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भुखंड पाहीजे असेल तर मला भेट असे सांगितले.
महीला पाथर्डीत आली तेव्हा राजेंद्र गर्जे याने तिला 18 आँगस्ट 2021 रोजी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील अर्जुना लाँन्सजवळीत एका गाळ्यात उपसभापती बसलेल्या आहेत तेथे जाऊ व समक्ष बोलु असे सांगुन पिडीत महिलेला तेथे जाण्यास सांगीतले. प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपसभापती अगर इतर कोणीही नव्हते.त्यांनंतर राजेंद्र गर्जे याने गाळ्याचे शटर बंद करुन तेथे पिडीत महिलेला जीवे मारण्याची धमकी देत विविस्त्र करुन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोठे काही बोललीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी देण्यात आली.
त्यानंतर सदर महीला तिच्या घरी गेली.त्यानंतर पुन्हा राजेंद्र गर्जे 22 आँगस्ट 2021 रोजी सकाळी ११ वाजता महीलेच्या घरी जाऊन तिच्या घरात तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हा सर्व प्रकार त्या महिलेने आपल्या पतीला सांगितला. नातेवाईक यांनी धीर देत पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात राजेंद्र गर्जे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण करीत आहेत.
Web Title: Rape case against husband of market committee deputy chairman