मित्राने गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडियो बनवून व्हायरल करण्याची धमकी
अहमदनगर | Rape case: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला तिच्या मित्राने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करून चित्रीकरण करून व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरात ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाकीर शाहीन शेख, मुन्ना शहाबाज शेख, निशाद शाहीन शेख रा. सोनई ता. नेवासा व ओंकार मिलिंद चवंडके रा. अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत. यातील निशाद शेख वगळता इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली आहे, २०१७ ते १८ जुलै २०२१ दरम्यान ही घटना घडली आहे, नगर शहरातील पिडीत तरुणी व आरोपी जाकीर शेख हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेत शेख याने २०१७ मध्ये तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला यावेळी आरोपीच्या एका साथीदाराच्या मदतीने अश्लील विडीयो चित्रीकरण केले हा व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने या तरुणीवर नगर शहरातील व सुपा येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला.
यातून पिडीत गर्भवती राहिली. आरोपीने साथीदाराच्या मदतीने गर्भपात घडवून आणला. या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Web Title: Rape Case Torture by a friend by giving him a narcotic