Home महाराष्ट्र शिष्येवर बलात्कार : आसाराम बापू दोषी, ६ आरोपी निर्दोष

शिष्येवर बलात्कार : आसाराम बापू दोषी, ६ आरोपी निर्दोष

Rape Case: आसाराम बापू याने आश्रमात राहात असलेल्या आपल्या शिष्येवर २००१ ते २००६ या कालावधीत अनेकदा बलात्कार, आज शिक्षा सुनावणार; अन्य सहा निर्दोष.

Rape of disciple Asaram Bapu guilty

गांधीनगर: शिष्येवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला सत्र न्यायाधीश डी. के. सोनी हे उद्या. मंगळवारी शिक्षा सुनावणार आहेत. पुरेशा पुराव्याअभावी आसाराम बापूच्या पत्नीसह ६ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आसाराम बापू याने आश्रमात राहात असलेल्या आपल्या शिष्येवर २००१ ते २००६ या कालावधीत अनेकदा बलात्कार केला असा एफआयआर अहमदाबाद येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी आसाराम बापू याला पोलिसांनी अटक केली होती. यासंदर्भातील खटल्यात सरकारी पक्षाने केलेला यक्तिवाद सत्र न्यायाधीश डी. के. सोनी यांनी मान्य केला व बलात्कार प्रकरणी आसाराम बापला न्यायालयाने दोषी ठरविले.

आसाराम बापूला याआधी आणखी एका बलात्कार (Rape) प्रकरणात अटक करण्यात आली होती.

जोधपूर येथे आसाराम बापू याने १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार त्याच्या आश्रमातील १६ वर्षे वयाच्या शिष्येने केली होती.

आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. दुसया प्रकरणात आसाराम बापूने बलात्कार केल्याची तक्रार सूरत येथील महिलेने पोलिसांकडे केली होती.

Web Title: Rape of disciple Asaram Bapu guilty

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here