Home अहमदनगर ब्रेकिंग न्यूज!  महिलेवर अत्याचार, ते विसरून जा, तुला काय पैसे पाहिजे असेल…..

ब्रेकिंग न्यूज!  महिलेवर अत्याचार, ते विसरून जा, तुला काय पैसे पाहिजे असेल…..

Crime News | Ahmednagar: लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार (Rape), गर्भपात करण्यास धमकी.

Rape of women, forget it, what money do you want

अहमदनगर: लग्नाचे अमिषा दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उपनगरात राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २९) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत संतोष बुऱ्हाडे, विशाल बुहाडे (दोघे रा. आनंद शाळे समोर, गुलमोहोर रस्ता, सावेडी) एक अनोळखी इसम, राजवीर शाही व बंटी (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मैत्रिणीच्या माध्यमातून फिर्यादीची प्रशांत बुऱ्हाडे याच्यासोबत जानेवारी २०२३ मध्ये ओळख झाली होती. त्याने फिर्यादीला फोन व मेसेज करण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी त्याने प्रेम संबंधाचा प्रस्ताव ठेवला. लग्नाचे आश्वासन देऊन वेळोवेळी अत्याचार केला. फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर तिला शारिरीक व मानसिक त्रास देऊन, जातीवाचक शिवीगाळ केले. गर्भपात करण्यास भाग पाडले.

गर्भपाता विषयीकोणाला काही सांगितले तर गायब करण्याची धमकी दिली. तसेच प्रशांत बुन्हाडेचा चुलतभाऊ विशाल बुन्हाडे याने प्रेमसंबंध थांबविण्यासाठी दम दिला. अनोळखी इसमाने प्रशांतचे काय असेल ते विसरून जा, तुला काय पैसे पाहिजे असेल ते त्याच्याकडून घेऊन देतो, ते लोक काही पण करू शकतात, अशी धमकी दिली. तसेच प्रशांतचे मित्र राजवीर शाही व बंटी हे गर्भपात करण्यासाठी उपस्थित असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  पुढील तपास शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे करीत आहेत.

Web Title: Rape of women, forget it, what money do you want

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here