Home नाशिक जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

Breaking News | Nashik: प्रेम प्रकरणात कुटुंबियांस जीवे ठार मारण्याची धमकी देत एका संशयिताने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना.

Rape of young woman threatening to kill her

नाशिक : प्रेम प्रकरणात कुटुंबियांस जीवे ठार मारण्याची धमकी देत एका संशयिताने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्ष अत्याचार सहन करूनही लग्न ठरल्यानंतर संशयिताने अश्लील व्हिडीओ आणि फोटो पिडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाइलवर पाठविल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सातभाई (रा. मुंबईनाका) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने २०२२ मध्ये पिडीतेशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबध निर्माण केले. याकाळात संशयिताने शालिमार भागातील एका लॉजवर तरुणीस घेवून जात बळजबरीने बलात्कार केला. कालांतराने तरुणीने नकार देताच संशयिताने आई व दोन भावंडाना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी युवतीवर बलात्कार केला.

या काळात त्याने तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. युवतीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच संशयिताने पिडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाइलवर ते फोटो व व्हिडीओ पाठविल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला आहे. अधिक तपास निरीक्षक आमणे करीत आहेत.

Web Title: Rape of young woman threatening to kill her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here