Home क्राईम आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार

आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार

Breaking News | Pune Crime: तुला आधार कार्ड देतो’ असे खोटे सांगून एका लॉजमध्ये घेऊन गेला अन शारीरिक संबध प्रस्थापित (Raped केल्याची घटना.

Raped a young woman on the pretext of removing Aadhaar card

पुणे : तुला आधार कार्ड काढून  देतो असे सांगून तरुणीला घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मागील दीड वर्षापूर्वी व सोमवारी (दि.29) दुपारी एकच्या सुमारास वडकी येथे घडला आहे.

याबाबत मांजरी फार्म येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.30) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विठ्ठल शिवाजी लांडगे (वय-25 रा. हेमाडे चाळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 354, 504, 506 सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीला ‘तुला आधार कार्ड देतो’ असे खोटे सांगून वडकी येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली किंवा कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर पीडित तरुणीला वारंवार फोन करुन तिच्यासोबत अश्लिल बोलून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title: Raped a young woman on the pretext of removing Aadhaar card

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here