Home क्राईम बलात्कारी भोंदू गुरुदासबाबाला अखेर अटक, तवेवाला बाबा पोलिसांच्या ताब्यात

बलात्कारी भोंदू गुरुदासबाबाला अखेर अटक, तवेवाला बाबा पोलिसांच्या ताब्यात

Breaking News | Amravati Crime: आश्रमात या भोंदू बाबाने भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तीचे सतत लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबास भोपाळ येथून अटक करण्यात आली आहे. (Rapist)

Rapist hypocrite Gurudas Baba finally arrested

अमरावती : तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून  पोलिसांनी त्याला भोपाल येथून अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील आश्रमात या भोंदू बाबाने भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून तीचे सतत लैंगिक शोषण केले होते. दरम्यान पीडित महिलेने 25 जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशन गाठत या बाबा विरोधात तक्रार केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.  त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला अन बाबांनी पळ काढला होता.  

तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा अल्पावधीतच प्रसिद्ध झाला होता. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदासबाबांच्या आश्रमात येत असे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी अशीच एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा, या अपेक्षेने समाधान शोधत होती. दरम्यान, हा गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो, असे तिला सांगण्यात आले होते.

मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली. तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली. त्यानंतर भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच या महिलेवर तीन महीने सतत बलात्कार (Rape) केला. 

पिडीत महिलेने भोंदू गुरुदास बाबाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 25 जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशन मध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली.  पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या बाबाने महिलेची अश्लील चित्रफीत सुद्धा केली असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. भोंदूबाबाने पिडितेला धमकी ही दिली की, या बाबत बाहेर कुणाला सांगितले तर जिवाशी मारू. आपल्या पतीची तब्बेत बरोबर राहत नाही, पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या भोंदू बाबाकडे ती पिडीत आली होती. मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेत पिडीतेवर वारंवार अत्याचार (abused) केला.

अखेर काल 8 जानेवारीच्या रात्री पोलीसांनी मोठ्या शिताफीने या बाबाला मध्यप्रदेश मधील भोपाळ येथून अटक केली. हा बाबा एका लॉज मध्ये असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Rapist hypocrite Gurudas Baba finally arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here